पूज्य भन्ते डॉ. धम्मदीप महाथेरो यांनी धुळे संदेश भूमीला दिली सदिच्छा भेट
धुळे | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक समितीचे महू अध्यक्ष पूज्य भन्ते डॉ. धम्मदीप महाथेरो यांनी धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेश भूमीला सदिच्छा भेट दिली. मुंबई येथून महूकडे जात असताना त्यांनी धुळे येथे थांबून संदेश भूमी परिसराची पाहणी केली व उपस्थित आंबेडकरी अनुयायांशी संवाद साधला.
यावेळी आयोजित विशेष बैठकीमध्ये जन्मभूमी स्मारक आणि संदेश भूमीच्या संरक्षण व संवर्धनाच्या कार्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच समाजहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन पूज्य भन्ते यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.
या प्रसंगी धुळे शहरातील अनेक बौद्ध बांधव, आंबेडकरी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उपस्थित होते. उपस्थितांनी पूज्य भन्ते डॉ. धम्मदीप महाथेरो यांचे स्वागत केले
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती, अध्यक्ष आनंद सैंदाणे यांनी केले






0 Comments