Raju Shetti on BRS : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केलं आहे. बीआरएसच्या चालीमागील डाव आहे तरी कोणाचा? अशी राजकीय पटलावर चर्चा सुरु असतानाच आता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti on BRS) यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. राजू शेट्टी यांनी या ऑफरचा गौप्यस्फोट केला आहे. शेट्टी यांनी सांगितले की, मला देखील मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव संपर्कात आहेत. दरम्यान, राजू शेट्टी यांनी केसीआर यांनी दिलेली मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली असून स्वतंत्र राहून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

0 Comments