भाजप जिल्हा सरचिटणीस महेंद्र ह्याळीज यांच्या मागणीला यश
डोंगराळे : दोंडाईचा–मालेगाव महामार्ग क्र. 160 वरील डोंगराळे गावाजवळ वाहनांचा वेग कमी करून अपघातांना आळा घालण्यासाठी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. यासाठी भाजप नाशिक जिल्हा सरचिटणीस महेंद्र ह्याळीज यांनी संबंधित महामार्ग प्रशासनाकडे मागणी करून पाठपुरावा केला होता.
डोंगराळे गावातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गावातील नागरिक, विद्यार्थी व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी गतिरोधकाची आवश्यकता होती. अखेर प्रशासनाने या मागणीची दखल घेत गतिरोधक बसविल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गतिरोधकामुळे भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण येऊन अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. मागणीला यश मिळाल्याबद्दल विष्णू आप्पा ह्याळीज, दिगंबर परदेशी, भूषण पाटील, ॲड. नितीन म्हसदे, अशोक जोशी, अशरफ दादा, दयाराम म्हसदे, रामकृष्ण साळुंखे, दादा ठाकरे, मुरलीधर सोनवणे, गणेश सोनवणे, भाऊसाहेब ठोंबरे, रावसाहेब गांगुर्डे, गौरव पाटील, राकेश म्हसदे यांनी समाधान व्यक्त करत संबंधित प्रशासनाचे व पाठपुरावा करणाऱ्यांचे आभार मानले.
डोंगराळे गावाच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, महामार्गावरील वाहतूक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

0 Comments