चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी द्या; डोंगराळे ग्रामस्थांची मागणी विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम आणि मालेगाव न्यायालय यांना निवेदन दिले

 चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी द्या; डोंगराळे ग्रामस्थांची मागणी विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम आणि मालेगाव न्यायालय यांना निवेदन दिले 

डोंगराळे (ता. मालेगाव):मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील एका ४ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या दोषी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी तीव्र मागणी डोंगराळे येथील समस्त ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम आणि मा. न्यायाधीशांकडे केली आहे.या अमानुष आणि संतापजनक घटनेमुळे केवळ डोंगराळे गावातच नव्हे, तर संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचा खटला गेल्या १ वर्षापासून न्यायालयात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्र येत सत्र न्यायालय, मालेगाव (जि. नाशिक) येथे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.ग्रामस्थांच्या मुख्य मागण्या:फाशीची शिक्षा आणि जलदगती खटला: पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथील एका अत्याचार प्रकरणात ज्याप्रमाणे आरोपीला अवघ्या ५५ दिवसांत फाशीचा निकाल देण्यात आला होता, त्याच धर्तीवर डोंगराळे येथील आरोपीचा खटलाही जलदगती न्यायालयाने चालवून त्याला तात्काळ फाशीची (मृत्युदंड) शिक्षा सुनावण्यात यावी.

गावात धिंड काढण्याची मागणी

: आरोपीला फाशी देण्यापूर्वी त्याची गावातून धिंड काढण्यात यावी, त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून मिरवणूक काढावी आणि गावातील मुख्य रस्त्यावरच त्याला फाशी द्यावी, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पोक्सो आणि कायदेशीर संरक्षण: आरोपीवर पोक्सो (POCSO) अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी आणि पीडित कुटुंबाला पूर्ण कायदेशीर संरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे 

 निवेदना वर.,महंत डॉ.योगी विलासनाथजी महाराज, महाराज गाळणे गोरक्षनाथ शिव पंचायतन मंदिर मठाधीश , जगदीश दुसाने , महेंद्र ह्याळीज , सरपंच विष्णू आप्पा ह्याळीज , दादा ठाकरे , भुषण पाटील,रामकृष्ण साळुंखे, भाऊसाहेब ह्याळीज,
ॲड नितीन म्हसदे, खुशाल देवरे , मनोहर ठाकरे, सतीश भदाणे ,,रमेश खैरनार, अशोक जोशी , उत्तम ह्याळीज वसंत ह्याळीज ,खुशाल ह्याळीज, प्रदीप ह्याळीज ,कल्पेश ह्याळीज , अशोक म्हसदे , छोटू म्हसदे,किरण म्हसदे,कपिल म्हसदे, आणि समस्त डोंगराळे ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments