जळगाव पी डब्ल्यू डी मधे ३० लाख गोलमाल.
जळगावला पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे.पी डब्ल्यू डी.पण येथे प्रायव्हेट वर्क्स डिपार्टमेंट म्हणूनच काम करीत आहेत.जसा काही हा निधी यांच्या मालकीचा आहे.पब्लिक ला अंधारात ठेवून चोरी करतात.आम्ही प्रशांत सोनवणे यांना भेटून सांगायला आलो आहोत कि तुम्ही मागेल त्याला वर्क ऑर्डर दिली पाहिजे.ऑनलाईन टाकली पाहिजे.त्यामुळे कळेल तरी कोणत्या ठेकेदाराला कोणता रस्ता बनवण्यासाठी किती निधी दिला आहे?त्यातून अभियंत्यांचा हिस्सा किती? त्यातून आमदाराचा हिस्सा किती? त्यातून पालकमंत्री ने किती टक्के घेतले?हे पण पब्लिक ला कळले पाहिजे.
एस्टीमेट मधे खडी,रेती, सिमेंट, डांबर चे प्रमाण लिहीलेले असते.तर वर्क ऑर्डर मधे रस्त्याची लांबी रूंदी खोली लिहीली पाहिजे.जेणेकरून नागरिकांना कळेल तरी हा रस्ता किती लांब, किती रूंद,किती खोल बनवणार आहेत.
आम्ही पी डब्ल्यू डी कार्यालयात गेलो तर तेथील छोटेमोठे अभियंते आणि कारकुन कैदी सारखे दिसतात
जसे यांची जीभ कापलेली आहे.डोळे फोडलेले आहेत.कान फाडलेले आहेत.कोणीच बोलायला तयार नसतो.मला तर येथे ग्रॅण्ट रोड फॉकलंड सारखे दृश्य दिसते.नेपाळ मधून पळवून आणलेले.
येथे काम करणारी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांची ओलांद सांगतो.कोणी महाराणा प्रतापसिंहांची ओलांद सांगतो.कोणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची औलाद सांगतो.पण तितकी हिंमत करीत नाहीत पब्लिकला उत्तर देण्याची.
माझ्या धर्माची , माझ्या जाती पातीची , माझ्या गावाकडची माणसे सुद्धा तोंड उघडत नाहीत.कारण चोरी करून करून यांची मानसिकता नेपाळ मधून पळवून आणलेल्या पोरींसारखी असते.धंदेका टाईम आहे.किसीसे बाते मत करो.माझ्या जातीचे अनेक अभियंता आहेत.कारकून आहेत.पण ते माझे राहिलेले नाहीत.ते चोरांच्या झुंडीत सामील झालेले आहेत.म्हणे प्रत्येक जातीला नोकरीत आरक्षण पाहिजे.काय उपयोग?
पी डब्ल्यू डी म्हणजे भ्रष्टाचाराचे मोठे केंद्र आहे.याच खात्याचे मंत्री छगन भुजबळ, नितीन गडकरी,अजित पवार, चंद्रकांत पाटील,सुभाष देशमुख आणि आता छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मालामाल झाले आहेत.हे मंत्री आणि अभियंता सोन्याने लखलखले आणि यांनी बनवलेले रस्ते सहा महिन्यांत उखडले.सार्वजनिक बांधकाम खात्याचा अर्धा निधी चोरी होतो.हे सांगणारा मंत्री अजून तरी महाराष्ट्रात जन्माला आला नाही.सार्वजनिक बांधकामाचा निधी चोरण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे.जर मागील सर्वच सा.बां.मंत्री आणी अभियंता उलटे टांगून झटकले तर एक वर्ष महाराष्ट्राचा कारभार चालेल इतका पैसा जमा होईल.मला अपेक्षा होती नरेंद्र मोदी कडून. ना खाऊंगा, ना गाने दुंगा.ते पण चोरांच्या झुंडीत सामील झाले आहेत.अजित पवार,छगन भुजबळ,नितीन गडकरी यांची संपत्ती मशीनवर नाही,टनावर मोजावी लागेल.
प्रशांत सोनवणे यांनी त्यांचाच कर्मचारी जयंतीलाल बाबुलाल परदेशी यांच्या मुलगा हर्षल यांना रिपेअरीचा ठेका आहे.हे बेकायदेशीर आहे.तब्बल २९ लाख ९२ हजार ४१८ रूपयाचा .तो एकटा पचवणार आहे कि इतकी मोठी रक्कम?एक कर्मचारी यावर आक्षेप घेत नाही.यातून प्रशांत सोनवणे किती घेतील? पालकमंत्री गुलाबराव किती घेतील? बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले किती घेतील?याची माहिती देणारी माणसे जळगावला जन्माला आली नाहीत अजून.
... शिवराम पाटील
जळगाव जिल्हा अध्यक्ष
प्रहार जनशक्ती पक्ष
१४/१०/२०२५
0 Comments