जिल्हा रुग्णालयात असलेल्या राज्यातील पहिल्या कॅथलॅब युनिटमध्ये ॲजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली आहे. सुमारे ७० वर्षीय एका रुग्णावर हि शस्त्रकिया झाली. तर या अजुनही काही रुग्णांची तपासणी केल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

महाराष्ट्रातील सुमारे १२ ठिकाणी कॅथलॅब युनिट मंजूर करण्यात आले होते. यापैकी अनेकांचे आज देखील बांधकाम सुरू आहे. तर धुळयातील युनिटचे गेल्याच महिन्यात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या युनिटमध्ये ३ ऑक्टोबर रोजी पहिली अँजिओग्राफी तपासणी करण्यात आली. तर यानंतर काल शुक्रवारी सुमारे ७० वर्षीय व्यक्तीवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णालयात आता पर्यत सुमारे १२ अँजिओग्राफी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहे. तर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याची हि पहिलीच वेळ होती. कार्डियाक कॅथलॅब विभागप्रमुख डॉ. रवींद्र सोनवणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. महेश भडांगे,डॉ. प्रांजल पाटील, डॉ. स्वप्निल सांगळे, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. विवेक जाधव यांच्यासह सहाय्यक अधिसेविका सरला शिंदे, वंदना मोरे यांच्यासह इतरांनी हि शस्त्रक्रिया पूर्ण केली.


Post a Comment

0 Comments