नगरसेवक नागसेन भाऊ बोरसे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
धुळे : धुळे महानगरपालिकेचे नगरसेवक नागसेन भाऊ बोरसे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धुळे यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सामाजिक व संघटनात्मक कार्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.
या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे धुळे जिल्हाध्यक्ष आयु. महेंद्र आण्णा महाले, उपाध्यक्ष आयु. दादासाहेब भानुदास भवरे, उपाध्यक्ष आयु. भटुभाऊ वाघ, आयु. सुहास रामराजे, जिल्हा संघटक आयु. अनिल केदार, आयु. नरेश वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी नागसेन भाऊ बोरसे यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.

0 Comments