भोंदूगिरीचा कॅप्टन अशोक खरातला 'ईडी'चा दणका; एकाच दिवसात १३.५० कोटी जप्त, २०० कोटींचे संशयास्पद व्यवहार उघड

नाशिक / प्रतिनिधी:

धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोककुमार खरात याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) ईडीने खरातला अटक केली असून, त्याच्या एका सहकाऱ्याकडून अवघ्या एका दिवसात तब्बल १३.५० कोटी रुपये थेट ईडीच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. पीएमएलए न्यायालयाने आरोपी अशोक खरातला २६ मे २०२६ पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

१२ बलात्काराचे गुन्हे आणि खंडणीचे मोठे रॅकेट

भोंदू अशोक खरात याच्याविरोधात महिलांना गुंगीचे औषध पाजून बलात्कार केल्याचे तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर आर्थिक फसवणुकीचे ५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या गुन्ह्यांत तो गेल्या दोन महिन्यांपासून आधीच जेलमध्ये होता.

तपासात समोर आले आहे की, खरातने 'अवतार पूजा' आणि इतर उपायांच्या बहाण्याने भाविकांकडून तब्बल ५.६२ कोटी रुपयांची खंडणी उकळली होती. या काळ्या पैशातून त्याने आलिशान मर्सिडीज कार खरेदी केली, अनेक परदेश वाऱ्या केल्या आणि स्वतःवर अमेरिकेत महागडे वैद्यकीय उपचारही करून घेतले होते.

पतसंस्थांमध्ये १०० हून अधिक बेनामी खाती; २०० कोटींचे व्यवहार

ईडीच्या मुंबई पथकाने केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातने आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी दोन पतसंस्थांचा पद्धतशीरपणे वापर केला. सिन्नर तालुक्यातील 'जगदंबा पतसंस्था' आणि अहिल्यानेर (अहमदनगर) येथील 'समता पतसंस्था' यांमध्ये खरात आणि त्याच्या साथीदारांनी १०० हून अधिक बेनामी (बोगस) खाती उघडली होती. या खात्यांमधून सुमारे २०० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे ईडीच्या तपासात उघडकीस आले आहे.

ईडीकडून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

या कारवाईदरम्यान ईडीने खरात आणि त्याच्याशी संबंधित ठिकाणांवरून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे:

रोख रक्कम: १३.९२ कोटी रुपये नगद.

विदेशी चलन: सुमारे ५.११ लाख रुपये.

सोने-चांदी: १.१२ कोटी रुपयांचे दागिने.

बँक खाती: २.२५ कोटी रुपये बँक खात्यात गोठवले.

इतर मालमत्ता: एमएच १५ जीएल ८१८१ क्रमांकाची आलिशान मर्सिडीज कार, आक्षेपार्ह कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि मालमत्तेच्या नोंदी.

भोंदू खरातच्या या काळ्या साम्राज्यात त्याची काळी कमाई गुंतवणाऱ्या आणि त्याला मदत करणाऱ्या इतर बड्या व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांचीही ईडीने चौकशी सुरू केली असून, अनेक जण आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या कारवाईमुळे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments