धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीसाठी AIMIM चे धरणे आंदोलन
धुळे महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ आणि विरोधी पक्षनेते पद AIMIM पक्षास देण्याच्या मागणीसाठी आज क्युमाईन क्लब, धुळे येथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील कलम 19-IAA नुसार विरोधी पक्षातील सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षास विरोधी पक्षनेते पद मिळण्याचा वैधानिक अधिकार असल्याचे सांगत धुळे महानगरपालिकेत AIMIM हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष असल्याने विरोधी पक्षनेते पद तात्काळ AIMIM पक्षास प्रदान करण्याची मागणी केली. तसेच माननीय बॉम्बे उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करून रिक्त असलेले विरोधी पक्षनेते पद त्वरित भरण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणे अयोग्य असल्याचे सांगितले. संबंधित प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास न्याय मिळविण्यासाठी माननीय बॉम्बे उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी इर्शाद जहागिरदार, नगरसेवक लल्लू शेठ, जावेद बिल्डर, साजिद अली साई, वसीम मंत्री, सऊद सरदार, मुख्तार मन्सुरी, शोएब बेग मिर्झा, आमिर पठाण तसेच पक्ष संघटनेतील पप्पू भैया मसालेवाले, शोएब पाल्टा अन्सारी, इस्राईल मिर्झा, फैसल अन्सारी, जैद जाकिर, मोइन शेख, जाहिद भाई, नवीद अहमद, शाबान अन्सारी, शोएब अन्सारी, आरिफ सय्यद, सऊद आलम, आसिफ अन्सारी, फिरोज चाचा, अख्तर अन्सारी, मुजाहिद शेख, शगुफ्ता शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




0 Comments