आज मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीची विद्यार्थी संघटना 'सम्यक विद्यार्थी आंदोलन' यांच्या वतीने NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंत्रालयावर 'विद्यार्थी आक्रोश मोर्चा'
काढण्यात आला.
सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण पद्धतीने मंत्रालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर बळाचा वापर आला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यांच्याशी मारहाण करण्यात आली तसेच अनेक विद्यार्थ्यांना बळजबरीने पोलीस वाहनांमध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवरील या कारवाईमुळे संताप व्यक्त केला जात असून, या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.



0 Comments