आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस

 आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस




Rohit Pawar : रोहित पवारांकडून अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. शेतकरी कर्जमाफीतील जाचक अट रद्द करण्यासाठी रोहित पवार यांच्याकडून हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. 

याच पार्श्वभूमीवर सावरकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेटिंग लावले आहेत. काल सकाळी नऊ वाजल्यापासून रोहित पवार यांच्या या अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात झाली. कर्जमाफीतील अटींविरोधात एल्गार पुकारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. 

याच कर्जमाफीतील जाचक अट रद्द करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे नेते देखील या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी येण्याची शक्यता आहे. रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. farmer

Post a Comment

0 Comments