धुळ्यात 'आदिवासी जनजागृती महामेळावा' उत्साहात संपन्न; हिरे भवन येथे समाजबांधवांची विशेष उपस्थिती
धुळे (विशेष प्रतिनिधी): येथील फाशीपूल जवळील हिरे भवन येथे आज दिनांक ५ जून २०२६ रोजी 'बिरसा मुंडा क्रांती दल, महाराष्ट्र राज्य' यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य "आदिवासी जनजागृती महामेळावा" अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याला संपूर्ण जिल्ह्यातून तसेच इतर भागांतून मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधवांनी हजेरी लावली होती.
कार्यक्रमाची सुरुवात जय जोहार, जय आदिवासी आणि जय भीम यांच्या जयघोषात महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करून करण्यात आली. बिरसा मुंडा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दादा बाबा सोनवणे,. देवा दादा सोनवणे आणि भारत भाऊ धुळेकर श्रीराम भाऊ सोनवणे अनिल पवार, महेंद्र बोरसे श्याम मोरे यांनी सर्व पाहुण्यांचे व वक्त्यांचे स्वागत केले. आदिवासी समाजाचे हक्क, प्रलंबित मागण्या, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती या विषयांवर जनजागृती करणे हा या महामेळाव्याचा मुख्य उद्देश होता.
प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन: आपल्या भाषणात आदिवासी समाजाच्या विविध हक्कांवर आणि सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. तसेच बिरसा ब्रिगेड महाराष्ट्राचे संस्थापक . सतिश दादा पेंडाम आणि राजस्थान येथून आलेले आदिवासी परिवाराचे . भवरलाल दादा परमार यांनी समाज संघटन मजबूत करण्याचा आणि अन्यायाविरुद्ध एकत्र येण्याचा संदेश दिला. समाजाला संघटित करून विकासाच्या प्रवाहामध्ये घेऊन जाण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र यावे असे आवाहन केले तसेच संविधानिक जबाबदारी आणि संविधानामार्फत असलेले आदिवासी समूहासाठी हक्क आणि अधिकार यांची जाणीव करून दिली. भांडवलशाही व्यवस्था कशाप्रकारे मजूर कष्टकरी यांचे शोषण करत आहे यासाठी लढा द्यावा लागेल वन हक्क कायदा आणि त्या बबतीत संरक्षण आदिवासी शेत जमीन लागू करणे आदिवासींसाठी महत्त्वाचे कायदे. वन हक्क कायदा 2006 जंगलातील जमीन व वनसंपत्तीवर पारंपरिक हक्क मान्य करतो.वैयक्तिक व सामुदायिक वनहक्क प्रदान करतो.PESA कायदा 1996अनुसूचित क्षेत्रांतील ग्रामसभेला विशेष अधिकार देतो.जमीन अधिग्रहण, खाणकाम व विकास प्रकल्पांबाबत ग्रामसभेची संमती आवश्यक. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989आदिवासींवरील अत्याचार, भेदभाव आणि अन्याय रोखण्यासाठी विशेष कायदा. जमीन अधिग्रहण, पुनर्वसन व पुनर्स्थापना कायदा 2013आदिवासींच्या जमिनीचे अधिग्रहण करताना विशेष संरक्षण व भरपाई. या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले
मान्यवरांची उपस्थिती: या ऐतिहासिक महामेळाव्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची 'प्रमुख पाहुणे' म्हणून ब्रिगेड महाराष्ट्राचे संस्थापक . सतिश दादा पेंडाम आणि राजस्थान येथून आलेले आदिवासी परिवाराचे . भवरलाल दादा परमार लक्षणीय उपस्थिती लाभली. अरविंद कांबळे अँड सूर्यकांत पवार , अनिल जाधव सर उपस्थित होते.
अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या मेळाव्याचे आभार प्रदर्शन आयोजकांतर्फे करण्यात आले.बिरसा मुंडा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दादा बाबा सोनवणे,. देवा दादा सोनवणे आणि भारत भाऊ धुळेकर श्रीराम भाऊ सोनवणे अनिल पवार, महेंद्र बोरसे श्याम मोरे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.





0 Comments