कॅफे गेस्ट रूमच्या नावाखाली अनैतिक कृत्यांना खतपाणी?
समाजात गुन्हेगारी वाढण्याची नागरिकांची भीती
धुळे प्रतिनिधी अलीकडच्या काळात काही कॉलेज परिसरात परवानगीशिवाय
चालणारे अवैध कॅफे व गेस्ट रूम यांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. गेस्ट रूमच्या नावाखाली अनैतिक कृत्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अल्पवयीन युवतींवर ब्लॅकमेलिंग करून अत्याचार करण्याचे प्रमाण कॅफेंमध्ये वाढले आहेअशा प्रकारांमुळे युवतींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
अवैध्य व्यवसायामुळे समाजात गुन्हेगारी वाढली असून त्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी कॅफे लॉज आणि गेस्ट रूम तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे

0 Comments