Dhule News | धुळ्यात शस्त्रसाठ्यावर एलसीबीचा छापा; गावठी पिस्तूल, 4 काडतुसे आणि वाहनासह आरोपी ताब्यात..
.-
धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत एका आरोपीला गावठी पिस्तूल व 4 जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी तो हाणून पाडल्याचे मानले जात आहे.
पोलिसांनी आरोपीकडून गावठी पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले असून, त्याच्याविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये (Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीकडे हे शस्त्र कुठून आले, त्याचा वापर कोणत्या उद्देशाने केला जाणार होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा सखोल तपास धुळे एलसीबीकडून केला जात आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
-

0 Comments