प्रा. मच्छिद्र ठाकरे यांचा सामाजिक कार्यकर्ते गोविंदा अहिरे यांच्या
वतिने सत्कार
धुळे : श्री. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या भाऊसाहेब ना. स. पाटील साहित्य आणि मु. फि. मु. अ. वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रा. मच्छिद्र गुलाब ठाकरे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या वतीने पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.
या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते गोविंदा अहिरे यांनी प्रा. मच्छिद्र ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांनी प्रा. ठाकरे यांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयासह धुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राची प्रतिष्ठा उंचावल्याची भावना व्यक्त केली.

0 Comments