धुळे : अवैध वाळू वाहतुकीविरोधातील कारवाईत जप्त करून पंचनामा करण्यात आलेली दोन ट्रॅक्टर आणि दोन वाळूने भरलेल्या ट्रॉली धुळे शहर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारातून गायब झाल्याची घटना समोर आली आहे. १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, उपविभागीय अधिकारी कार्यालयासारख्या शासकीय परिसरातून जप्त मुद्देमाल चोरीला गेल्याने वाहन सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

0 Comments