महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त राज्यभर ‘समता क्रांती मार्च’
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)च्या वतीने आयोजन; सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यांत जनजागृती
मालेगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्वीजन्मशताब्दी वर्षानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात **‘समता क्रांती मार्च’**चे आयोजन करण्यात आले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री . रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ ते रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर हा मार्च आयोजित करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर आगामी **‘समता क्रांती मार्च’**च्या नियोजनाबाबत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मार्चच्या माध्यमातून सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीस रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दादाजी आप्पा महाले, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील यशोद, जिल्हा सरचिटणीस आनंद यशोद, तालुकाध्यक्ष विकास दादा केदारे, युवा जिल्हाध्यक्ष सुशील उशिरे, युवा जिल्हा उपाध्यक्ष किरण पगारे,
भैय्या म्हसदे, तालुका संपर्कप्रमुख रवी खरे, संजय महीरे, रमेश आहिरे, विकी अहिरे, गौरव गरुड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय’ या संविधानिक मूल्यांच्या जनजागृतीसाठी ‘समता क्रांती मार्च’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


0 Comments