रहिमपुरे-रामनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन व फलकाचे अनावरण!
शिंदखेडा तालुक्यातील रहिमपुरे-रामनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे मोठ्या जल्लोषात व उत्साहात उद्घाटन करण्यात आले. तसेच शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
ॲड. बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्रजी पाटोळे यांच्या सूचनेनुसार पक्षाची संघटनात्मक बांधणी गावागावांत मजबूत करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी धुळे जिल्हा संघटक शंकरा अण्णा खरात, धुळे जिल्हा युवक उपाध्यक्ष राहुल भाऊ पाटोळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धुळे जिल्हाध्यक्ष रोहित बागुल , पत्रकार नवनीत बागले, तसेच गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या माध्यमातून वंचित, गरीब, दलित, दुर्बल आणि बहुजन समाजापर्यंत सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक हक्कांचा विचार पोहोचवून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.
छोटूलाल पाटील, महेंद्र रामराजे, जुलालबाबा रामराजे, राकेश रामराजे, गणेश निकुंबे, कुणाल रामराजे, प्रशांत आखाडे, विनोद रामराजे, सुरेश रामराजे, लोटन रामराजे, रोहित रामराजे, अमोल रामराजे, विजय रामराजे, मनोहर रामराजे, सुनील रामराजे, पिंटू आखाडे, सतीश आखाडे, राहुल रामराजे, लक्ष्मण रामराजे, सतीश रामराजे, भैय्या रामराजे, लहू रामराजे, योगेश बेडसे, राहुल विनोद रामराजे, राहुल बागले, शुभम पाटोळे, मनोज आखाडे, नारायण पवार, बापू सदा पाटोळे, संतोष रामराजे, नानू भाऊ, केदारजी भाऊ, केदार, सोनू निकुंबे, दीपक रामराजे, शांताराम रामराजे, विकी राम तसेच रहिमपुरे-रामनगर येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


0 Comments