धुळे जिल्हा स्वातंत्र्य दिन


 

धुळे : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासोबत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने एक वर्षांच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे यांनी केले.


स्वातंत्र्य दिनांचा 76 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात

ते आज भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, महापौर प्रतिभाताई चौधरी, आमदार मंजुळाताई गावित, स्थायी समिती सभापती भारती भामरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, उपवनसंरक्षक नितीन सिंग, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, सहायक पोलीस अधिक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, अरविंद अंतुर्लीकर, महेश जमदाडे, सुरेखा चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुसे म्हणाले की, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहे. यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य संरक्षणात प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लक्ष एवढी वाढ केली असून राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना पाच लाखापर्यंतचा उपचाराचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान ’ योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. ‘सर्वांसाठी घरे-2024’ हे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील पात्र कुटूंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ राबविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments