आदेश मराठे यांची शिवसेना धुळे शहर युवक उपाध्यक्षपदी निवड
धुळे : आदेश मराठे यांची शिवसेना धुळे शहर युवक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत कार्यकारणी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक सचिव राहुलजी लोंढे सचिव किरण भैय्या साळी उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव अविष्कार भाईजी भुसे शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज दादासाहेब मोरे युवा सेना जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली.
आदेश मराठे यांच्या निवडीमुळे शहरातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच युवकांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्यासाठी ते सक्रियपणे काम करणार असल्याचे सांगण्यात आले.
नवनियुक्त शहर युवक उपाध्यक्ष आदेश मराठे यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून धुळे शहरातील युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
त्यांच्या निवडीबद्दल शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व समर्थकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 Comments