डोंगराळे येथे जैतोबा महाराज देवस्थानातील पुतळा आई मंदिर नूतनीकरणाचा शुभारंभ
डोंगराळे : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे जैतोबा महाराज देवस्थान परिसरातील पुतळा आई मंदिराच्या नूतनीकरणाच्या कार्याचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. या नूतनीकरण कार्याची संकल्पना सुधीर नारायण म्हसदे यांनी मांडली असून, धार्मिक स्थळाच्या विकासासाठी त्यांनी स्वखर्चाने मंदिर बांधकामास योगदान दिले आणि मंदिर पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आहे या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले आणि त्यांचे आभार मानण्यात आले
शुभारंभ प्रसंगी विजय म्हसदे सर, साहेबराव खैरनार, छोटू म्हसदे, विक्रम म्हसदे, भगवान म्हसदे,नबाबाई म्हसदे, वर्षा म्हसदे, चित्रा म्हसदे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ विधिवत पूजन करण्यात आले. मंदिराच्या नूतनीकरणामुळे देवस्थान परिसराला नवीन रूप मिळणार असून, भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
ग्रामस्थांनी या नूतनीकरण कार्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून, कामासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.

0 Comments