प्रतिनिधी नितीन म्हसदे 

*प्रभाग क्र.२ मधील एकतानगर येथे*  

 *खासदार निधीतून सभामंडप बांधणे* 

 *कामाचे भुमीपुजन समारंभ संपन्न* 

धुळे :- येथील देवपूर प्रभाग क्र.२ मधील एकतानगर भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोर  सभामंडप बांधणे गरजेचे होते. म्हणून श्री विठ्ठल मंदिर सेवा समिती व विठुमाऊली भजनी मंडळाचे सर्व सदस्यांच्या वतीने सुचक श्री. दिनेश आण्णा पाटील यांनी खासदार डॉ. शोभाताई दिनेश बच्छाव यांच्याकडे सभामंडप बांधण्यासाठी विनंती मागणी केली होती. त्यानुसार खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी आपल्या खासदार निधीतून दहा लाख रुपये मंजूर करून सभामंडप बांधण्यात येणार आहे. 

त्या सभामंडप बांधणे कामाचा भुमीपुजन समारंभ डॉ. शोभाताई दिनेश बच्छाव यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

   यावेळी प्रथम त्यांच्या हस्ते श्री.विठ्ठलाची आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच दि. २९ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पण देण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अतुलभाऊ सोनवणे व उपजिल्हाप्रमुख श्री. नरेंद्र परदेशी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच विठ्ठल मंदिर सेवा समिती व विठुमाऊली भजनी मंडळाचे सर्व सदस्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लवकरच सभामंडप बांधकामाला सुरुवात होईल. 

विठ्ठल मंदिर सेवा समिती व विठुमाऊली भजनी मंडळाच्या वतीने खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांचे विशेष आभार मानण्यात आले.


Post a Comment

0 Comments