प्रतिनिधी नितीन म्हसदे
धुळे पंचायत समितीत महिला आरक्षणामुळे सोनगीरसह मेहेरगावला सभापतिपदाची संधी
धुळे पंचायत समितीत महिला आरक्षणामुळे सोनगीरसह मेहेरगावला सभापतिपदाची संधी
धुळे तालुका पंचायत समितीच्या ३० गणांची आरक्षण सोडत सोमवारी प्रातांधिकारी रोहन कुवर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण तहसील कार्यालयात काढण्यात आली. आरक्षण सोडतीत काही गण महिलांसाठी राखीव झाल्याने अनेकांची अडचण झाली. सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेचे निघाले आहे. त्यामुळे लामकानी, सोनगीर, मेहेरगाव, आर्वी, चिंचखेडे, शिरूड या गणातून विजयी होणाऱ्या महिलेला सभापतिपदाची संधी मिळेल.
आरक्षण सोडत प्रक्रिया राबवताना अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे, निवासी नायब तहसीलदार संजय पवार, देवेंद्र येवले, महसूल सहाय्यक विशाल मोहिते आदी उपस्थित होते. आरक्षणात अनेक ठिकाणी फेरबदल झाले. अनेकांचे गण महिलांसाठी राखीव झाल्याने दिग्गजांची अडचण झाली आहे. काही ठिकाणी यापूर्वी अनुसूचित जमातीचे आरक्षण निघाले होते. या ठिकाणी पुन्हा त्या प्रवर्गाचे आरक्षण निघाल्याने इतरांची संधी गेली. पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सहा गण राखीव आहे. या गणातून निवडून येणाऱ्या महिलेला सभापतिपदाची संधी मिळेल हे आता निश्चित झाले आहे. पंचायत समितीत ३० गण असून त्यातील १५ गण महिलांसाठी राखीव झाले आहे. सर्वसाधारण प्रवर्गात १३ पैकी गण ६ महिलांसाठी, नामाप्रमध्ये ८ पैकी ५ गण महिलांसाठी, अनुसूचित जमातीत ७ पैकी ४ गण, अनुसूचित जातीत २ पैकी १ गण महिलेसाठी राखीव असेल.
आरक्षण असे : सर्वसाधारण : कापडणे, बिलाडी, शिरधाने प्र.नेर, निमगुळ, मोघण, बोरकुंड, विंचूर. सर्वसाधारण महिला : लामकानी, सोनगीर, मेहेरगाव, आर्वी, चिंचखेडे, शिरूड. नागरिकांचा मागास प्रवर्ग : नंदाणे, मोहाडी प्र.डा, निमडाळे, नेर. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : बोरीस, नगाव, बोरविहिर, मुकटी. अनुसूचित जमाती : न्याहळोद, देऊर बुद्रुक, आनंदखेडे. अनुसूचित जमाती (महिला) : कुसुंबा, चौगांव, सडगाव, नरव्हाळ. अनुसूचित जाती : फागणे. अनुसूचित जाती (महिला) : हें
द्रुण.

0 Comments