मालेगावात 'घटसर्प' रोगामुळे दोन बालकांचा मृत्यू; नागरिकांमध्ये भीतीचे सावट, आरोग्य यंत्रणा हादरली


 मालेगावात 'घटसर्प' रोगामुळे दोन बालकांचा मृत्यू; नागरिकांमध्ये भीतीचे सावट, आरोग्य यंत्रणा हादरली

मालेगाव: आरोग्य क्षेत्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालेगाव शहरात 'घटसर्प' (Diphtheria) या गंभीर आजाराने दोन निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून हा आजार जवळपास हद्दपार (कालबाह्य) झाल्याचा दावा केला जात असताना आणि लसीकरणावर मोठा निधी खर्च होत असतानाच ही घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळबळ उडाली आहे. लसीकरणानंतरही दोन बालकांचा मृत्यू झाल्याने स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर आणि कारभारावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजस्थानी कुटुंबातील बालकांचा समावेश

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत पावलेली दोन्ही बालके गेल्या अनेक वर्षांपासून मालेगावात वास्तव्यास असलेल्या एका मूळ राजस्थानी कुटुंबातील होती. शासनाच्या नियमांनुसार बालकांचे लसीकरण झाले असतानाही त्यांना या आजाराची बाधा कशी झाली? आणि त्यात त्यांचा मृत्यू कसा झाला? या गंभीर प्रश्नाने मृत बालकांच्या पालकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

या दुर्दैवी घटनेमुळे मालेगाव शहरात तीव्र घबराहट पसरली असून, आरोग्य विभागाच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मालेगावात आरोग्याचे प्रश्न नेहमीच गंभीर राहिले आहेत. कधीकाळी कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या या शहरात टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया आणि डायरिया यांसारखे आजार आता नित्यनयाचेच झाले आहेत. अशा परिस्थितीत, आता थेट 'घटसर्प'सारख्या घातक आजाराने दोन बालकांचा बळी घेतल्यामुळे महापालिका प्रशासन आणि वरिष्ठ आरोग्य यंत्रणेने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

काय आहे घटसर्प रोग? (तज्ज्ञांचे मत)

या दुर्दैवी निमित्ताने घटसर्प या रोगाबाबत जनजागृतीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

संसर्गजन्य आजार: पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांमध्ये आढळणारा हा संसर्गजन्य आजार अतिशय धोकादायक ठरू शकतो.

लक्षणे: विशेषतः गाई आणि म्हशींमध्ये याची लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.

उपाय: वेळेत लसीकरण आणि योग्य उपचार न झाल्यास जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा प्रादुर्भाव मानवामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये पसरू नये म्हणून लसीकरण मोहीम वेगाने आणि प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments