भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पंचधातू पुतळ्याच्या नूतनीकरणासह डोंगराळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरण तथागत गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना कामाचे लोकार्पण सोहळा


















📍 डोंगराळे, ता. मालेगाव | प्रतिनिधी

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पंचधातू पुतळ्याच्या नूतनीकरणासह डोंगराळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरण तथागत गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना कामाचे लोकार्पण सोहळा शुक्रवार, १५ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री  रामदासजी आठवले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे  खासदार शोभाताई बच्छाव  यांच्यासह आर.पी.आय. (आ. गट) पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मा. ना. रामदासजी आठवले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मालेगाव महानगरीत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विश्वरत्न डॉ बबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर केला. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला समानता, न्याय आणि शिक्षणाचा मार्ग दिला असून त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, संविधान आणि सामाजिक समतेच्या माध्यमातून देशाला नवी दिशा दिली. त्यांच्या विचारांचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. डोंगराळे येथील हे काम पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.”

चौक सुशोभीकरणामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यास मदत होणार असून नागरिकांना स्वच्छ, आकर्षक आणि प्रेरणादायी सार्वजनिक ठिकाण उपलब्ध झाले आहे. पुतळ्याच्या नूतनीकरणामुळे बाबासाहेबांच्या स्मृती अधिक भव्य स्वरूपात जपल्या जाणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

 

Post a Comment

0 Comments