सोशल मीडियावर राहुल गांधींची जबरदस्त क्रेझ; फेसबुक पोस्टला लाखो लाईक्स
नवी दिल्ली : काँग्रेस चे राहुल गांधी यांच्या सोशल मीडिया पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. तमिळनाडूतील शपथविधी सोहळ्याशी संबंधित राहुल गांधी यांच्या फेसबुक पोस्टला अवघ्या दोन दिवसांत तब्बल 4.43 लाखांहून अधिक लाईक्स, 22 हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आणि 12 हजारांपेक्षा अधिक शेअर्स मिळाले आहेत.
दुसरीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांना दिलेल्या शुभेच्छा पोस्टला सुमारे 1.29 लाख लाईक्स मिळाल्याचे दिसून येत आहे.
या आकडेवारीमुळे सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या पोस्टची लोकप्रियता आणि युवा वर्गातील प्रभाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेषतः फेसबुकवरील एंगेजमेंटच्या बाबतीत राहुल गांधी यांची “हवा” असल्याच्या प्रतिक्रिया समर्थकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
राजकीय घडामोडींमध्ये सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम बनले असून, नेत्यांच्या पोस्टवरील लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स यावरून जनतेचा प्रतिसाद मोजला जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

0 Comments