ॲम्बुलन्स मधून गोवंशाची तस्करी; गोरक्षकांसह पोलिसांनी केली कारवाई..

 ॲम्बुलन्स मधून गोवंशाची तस्करी; गोरक्षकांसह पोलिसांनी केली कारवाई..

मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ एका ॲम्बुलन्स मधून होणारी गोवंशाची तस्करी गोरक्षकांनी रोखली असून आज पहाटेच्या सुमारास मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे... या ॲम्बुलन्स मध्ये अतिशय निर्दयी पद्धतीने गाईंना कोंबण्यात आल्याचे यावेळी पाहायला मिळाले... याबाबत सोनगीर पोलिसांना माहिती मिळतच पोलिसांनी घटनास्थळी दाखल सदरचे वाहन ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे... बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गाईंची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी गोरक्षकांनी केली आहे... 


Post a Comment

0 Comments