भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा

महाराष्ट्र : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना” सध्या ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देत शेती अधिक सक्षम व स्वावलंबी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

योजनेअंतर्गत नवीन विहीर बांधकामासाठी सुमारे २.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. तसेच जुनी विहीर दुरुस्ती, ठिबक व तुषार सिंचन, पंप संच, बोअरवेल, वीज जोडणी, शेततळे अस्तरीकरण तसेच पीव्हीसी पाइप व पंपसाठीही आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते.

या योजनेमुळे शेतीसाठी पाण्याची कायमस्वरूपी सुविधा निर्माण होऊन उत्पादन वाढीस मदत होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत असून ग्रामीण भागात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

शासनाने पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्या

Post a Comment

0 Comments