संविधान बचाव – आरक्षण बचाव यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 संविधान बचाव – आरक्षण बचाव यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन


धुळे, प्रतिनिधी : भारतीय संविधानाने दिलेल्या सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी 9 जून 2026 रोजी  11.00  सकाळी ठिकाण गुलमोहर रेस्ट हाऊस  सुरुवात होऊन यात्रा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकापर्यंत होणार आहे

 धुळे शहरात "संविधान बचाव – आरक्षण बचाव यात्रा" आयोजित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या प्रयत्नांविरोधात जनजागृती करणे तसेच संविधानिक हक्कांचे संरक्षण करणे हा या यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सध्या अनुसूचित जाती प्रवर्गात उपवर्गीकरणाच्या प्रस्तावांमुळे समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून संविधानातील समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे.

यात्रेद्वारे संविधानाचे संरक्षण, आरक्षणाचे रक्षण, अनुसूचित जाती प्रवर्गातील उपवर्गीकरणास विरोध, शिक्षण व रोजगारातील आरक्षित जागा भरणे, संविधानिक हक्कांबाबत जनजागृती करणे तसेच समाजामध्ये एकता व संघटन निर्माण करणे या प्रमुख मागण्या मांडल्या जाणार आहेत. यासोबतच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष. दीपक भाई केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या यात्रेत सर्व समाज बांधव, युवक, महिला, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

"संविधान वाचवा – आरक्षण वाचवा – समाज जोडा" हा संदेश देत ही यात्रा सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments