दलित नगरसेवकाचे नाव डावलल्याच्या निषेधार्थ पालकमंत्र्यांना घेराव

 दलित नगरसेवकाचे नाव डावलल्याच्या निषेधार्थ पालकमंत्र्यांना घेराव

साक्री, दि. 10 जून 2026 : साक्री नगरपंचायतीतर्फे अटल उद्यानाच्या भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री . जयकुमार रावल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार 



मंजुळाताई गावित यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, साक्री शहरातील प्रभाग क्रमांक 15 चे दलित नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक 



दीपक वाघ यांचे नाव हेतुपुरस्सर वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. भारतीय जनता पक्षासोबत सातत्याने सक्रियपणे कार्य करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ला योग्य स्थान दिले जात नसल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे साक्री तालुकाध्यक्ष . कमलाकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पालकमंत्री . जयकुमार रावल यांना घेराव घालून संबंधित प्रकाराबाबत जाब विचारला. तसेच दलित प्रतिनिधींचा अवमान करणाऱ्या साक्री नगरपंचायत प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. :::


Post a Comment

0 Comments