शेतकरी कर्जमाफी रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन मागे

मोठी बातमी, रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन मागे


रोहित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये तीन दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे रोहित पवारांकडून अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. शेतकरी कर्जमाफीतील जाचक अट रद्द करण्यासाठी रोहित पवार यांच्याकडून हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत होते. कर्जमाफीतील अटींविरोधात एल्गार पुकारण्यात आला होता. 

काल मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांची आंदोलनस्थळी जात भेट दिली. गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये रोहित पवार यांच्याकडून अन्नत्याग आंदोलन सुरू होते. आज अखेर रोहित पवार यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रोहित पवारांनी उपोषण मागे घेतले असून कर्जमाफीच्या मुद्द्यावर 22 जूनपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याचे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

 रोहित पवार यांच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांना दिले. त्यानंतर आता अखेर रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं आहे.

Post a Comment

0 Comments