नांद्रे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 

नांद्रे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

नांद्रे, दि. २१ जून २०२६ : विद्या विकास हायस्कूल, भाग शाळा नांद्रे येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक  बी. बी जाधव सर तसेच . ए. टी. सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, असे सांगत त्यांनी विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

तसेच  एस के जाधव सर, . के. पी. पाटील सर आणि . व्ही. एल. वाडिले सर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने प्रत्यक्ष करून दाखवत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान . बी. टी. नेरकर सर यांनी विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली.

या योग दिन कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचला.

Post a Comment

0 Comments