दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) कडूनसुरू करण्यात आलेले आंदोलन शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
अमेरिकेतून थेट दिल्लीत आंदोलनासाठी आगमन
अभिजीत दिपके हे अमेरिकेतून थेट भारतात येत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. जंतर-मंतर येथे हजारो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलन पुकारले असून, “विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
‘थाळी-चमचा’ आंदोलनाने लक्ष वेधले
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘थाळी-चमचा’ वाजवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. “गो प्रधान गो”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी वातावरण दणाणले
अमेरिकेतून थेट दिल्लीत आंदोलनासाठी आगमन
अभिजीत दिपके हे अमेरिकेतून थेट भारतात येत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. जंतर-मंतर येथे हजारो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलन पुकारले असून, “विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
‘थाळी-चमचा’ आंदोलनाने लक्ष वेधले
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘थाळी-चमचा’ वाजवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. “गो प्रधान गो”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी वातावरण दणाणले
रात्रभर आंदोलन; समर्थकांना सकाळी उपस्थित राहण्याचे आवाहन
शनिवारी दुपारी एक वाजता सुरू झालेले आंदोलन पोलिसांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मर्यादित ठेवले होते. मात्र, “शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय आम्ही जंतर-मंतर सोडणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत आंदोलनकर्त्यांनी ठिकाण सोडण्यास नकार दिला.
मध्यरात्री प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये अभिजीत दिपके यांनी म्हटले, “आमचे आंदोलन रात्रभर आणि उद्याही सुरू राहणार आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.” तसेच रविवारी सकाळी नऊ वाजता मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी समर्थकांना केले.
लाईट आणि पाणी बंद केल्याचा आरोप
आंदोलनादरम्यान संध्याकाळनंतर जंतर-मंतर परिसरातील लाईट बंद करण्यात आली तसेच माईकही बंद करण्यात आल्याचा आरोप दिपके यांनी केला. आंदोलकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये दिपके पोलीस कर्मचाऱ्यांना विचारताना दिसले, “पाणी आणि लाईट बंद करण्याचा आदेश नेमका कुणी दिला?”
पोलीस बंदोबस्त वाढला, तणावाचे वातावरण
आंदोलनस्थळी जाणाऱ्या मार्गांवर पोलिसांनी कडक नियंत्रण ठेवले. काही आंदोलकांना बाहेरच घोषणाबाजी करावी लागली.
दिपके यांनी पोलिसांकडे आंदोलनाची मुदत वाढवण्याची विनंती केली होती. मात्र, पोलिसांनी मैदान रिकामे करण्याचे आदेश दिल्यानंतर तणाव वाढल्याचे दिसून आले. काही वेळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीची परिस्थितीही निर्माण झाली.
‘जेल भरो’ आंदोलनाचे आवाहन
अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत, “जर मला अटक झाली तर देशभरातील तरुणांनी आपल्या जिल्ह्यांमध्ये ‘जेल भरो’ आंदोलन सुरू करावे,” असे आवाहन केले. मात्र, आंदोलन शांततापूर्ण ठेवण्याचेही त्यांनी समर्थकांना सांगितले.
विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईची मागणी

0 Comments