ऑनलाइन परीक्षा ही भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्यासाठीच...", स्पर्धा परीक्षार्थींचा छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा! जाणून घ्या प्रमुख मागण्या

 ऑनलाइन परीक्षा ही भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्यासाठीच...", स्पर्धा परीक्षार्थींचा छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा! जाणून घ्या प्रमुख मागण्या


MPSC student protest Chhatrapati Sambhajinagar Delhi Gate : राज्यातील विविध स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे, पेपरफुटी आणि ऑनलाईन परीक्षांमधील वाढत्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये युवाशक्तीचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला. एमपीएससी परीक्षा ऑफलाइन हवी या प्रमुख मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी दिल्ली गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला. यावेळी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. 

, छत्रपती संभाजीनगर: ‘एमपीएससी परीक्षा ऑफलाइनच हवी’ या मुद्द्यावर शहरात युवाशक्ती एकवटलेली दिसली. ‘एमपीएससी’सह पोलिस भरती, लघुलेखक आणि शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांनी दिल्ली गेट ते विभागीय आयुक्त कार्यालय परिसर दणाणून सोडला.

हे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आले. आंदोलनासाठी सकाळपासून शहरातील विविध भागांतून विद्यार्थी दिल्ली गेटजवळ जमा होत होते. स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी व गैरप्रकार थांबवा, एमपीएससी परीक्षा ऑफलाइनच घ्या आणि पोलिस भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करा, अशा विविध घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाला आमदार रोहित पवार, क्रॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके, विठ्ठल कांगणे, रविकांत तुपकर, नितेश कराळे, अमोल देशमुख, बाळासाहेब शिंदे, रविराज साबळे, दीपक केदार, अमोल गाडेकर, शिवराज मोरे, सागर साळुंके आणि अभिषेक शिंदे पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments