📗🖊️🖋️📕... समस्त आदिवासी पंच मंडळ बोरविहीर यांच्या मार्फत ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांना वही -पेन वाटपाचा कार्यक्रम संपन्न...📗
🖋️🖊️📕
__________________________________________
धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत बोरविहीर येथे आदिवासी पंच मंडळ बोरविहीर यांच्या मार्फत, ग्रामपंचायत बोरविहीर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा, जयपाल सिंग मुंडा,तंट्यामामा भील, खाज्या नाईक, यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदिवासी टाईगर सेना, महाराष्ट्र राज्य सचिव ॲड.प्रविण मोरे, किरण(आण्णा) ठाकरे(सरपंच, बोरविहीर), गोविंदाभाऊ अहिरे, धुळे तालुकाध्यक्ष ATS, श्री.दादाबाबा सोनवणे(बिरसा क्रांती दल धुळे शहर), शुभमभाऊ ठाकरे, गोविंदाभाऊ माळी, अनिलभाऊ पवार,रामभाऊ सोनवणे, रामदास सोनवणे सर, शामदादा सोनवणे, प्रतापदादा माळी, राजेंद्रदादा ठाकरे, सुनीलभाऊ वाघ, विक्की ठाकरे, उमेश पवार, आकाश मोरे, गोविंदा माळी, समाधान अहिरे, दिनेश गायकवाड, मयूर माळी, रवी माळी, सागर मोरे, निलेश माळी, चेतन माळी, ऋतिक अहिरे, भटूभाऊ ढमढेरे,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक -शिक्षिका आदी मान्यवर तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी ॲड. प्रविण
(दादा) मोरे,गोविंदाभाऊ अहिरे,रामदास सोनवणे सर यांनी समाज बांधवांना महापुरुष,क्रांतिवीरांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षण हे सामाजिक व आर्थिक प्रगतीचे प्रभावी माध्यम असून, प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित अभ्यास, वाचन व लेखनाची सवय लावून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असे उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.आदिवासी दिन केवळ उत्सव म्हणून न साजरा करता शिक्षण,आरोग्य, संस्कृती आणि सामाजिक विकासाला चालना देणारे उपक्रम राबविणे गरजेचे आहे,असा संदेश यावेळी देण्यात आला.

0 Comments