स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार अन् कृषी उद्योगांना चालना द्या; 'क्रांतिकारी शेतकरी संघटने'चे उद्योगमंत्र्यांना निवेदन
धुळे:
धुळे जिल्ह्यातील भूमिपुत्रांना स्थानिक औद्योगिक वसाहतींमध्ये (MIDC) रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी 'क्रांतिकारी शेतकरी संघटना' उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर उखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्योगमंत्री . उदयजी सामंत यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात जिल्ह्यातील शेतकरी आणि तरुणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत:
स्थानिक भूमिपुत्रांना भरती करा: धुळे जिल्ह्यातील नरडाणा, धुळे, शिरपूर आणि साक्री येथील MIDC मधील कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना (भूमिपुत्रांना) प्राधान्याने नोकरी व रोजगार देण्यात यावा.
कृषी प्रक्रिया व 'हब'ची निर्मिती: कापूस, कांदा, ऊस व भाजीपाला या शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, सोलर ड्रायर, तसेच कांदा पावडर उद्योगांसाठी शासनस्तरावर स्वतंत्र 'हब' निर्माण करण्यात यावे.
कर्जमाफीची रक्कम जमा करा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹२,००,००० (दोन लाख) संपूर्ण कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी आणि बँकांनी सुरू केलेली OTS (वन टाईम सेटलमेंट) प्रक्रिया बंद करावी.
धुळे जिल्ह्यातील शेतकरी व उद्योगाकडे वळणाऱ्या नवतरुणांच्या पाठीशी शासन व बँकांनी खंबीरपणे उभे राहावे, जेणेकरून जिल्ह्यात मोठी गुंतवणूक होऊन नवे उद्योग-धंदे सक्षमपणे सुरू होतील, अशी आग्रही मागणी ईश्वर उखा पाटील यांनी केली आहे.

0 Comments