घरकुलाच्या जागेसाठीमहिलांचे बिऱ्हाड आंदाेलन:अपर जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच चुली
प्रतिनिधी| मालेगाव
तालुक्यातील खलाणे गावच्या पाच महिलांना घरकुले मंजूर झाली आहेत. मात्र, घरकुल बांधण्यासाठी ग्रामपंचायत जागा उपलब्ध करुन देत नसल्याने संतप्त महिलांनी कुटूंबासह बिऱ्हाड आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी (दि. १५) अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ चुली मांडून प्रशासनाचा निषेध केला. लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. घरकुलांचा लाभ मिळत नसल्याने पाठपुरावा केला होता. अखेर घरकुले मंजूर झाली आहेत. परंतु, घरकुल बांधायला जागा मिळत नाही. ग्रामपंचायत जागा शिल्लक नसल्याचे { उर्वरित. पान २
जागेच्या मागणीसाठी संबंधित महिलांनी यापूर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र, याची कुठलीही दखल घेतली गेली नाही. मागणीकडे दुर्लक्ष केल्याने बिऱ्हाड आंदोलन छेडण्याचा वेळ आली आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

0 Comments