डोंगराळे हत्या प्रकरणात फाशीचा निकाल; ग्रामस्थांच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

 डोंगराळे हत्या प्रकरणात फाशीचा निकाल; ग्रामस्थांच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार


डोंगराळे, ता. मालेगाव, जि. नाशिक : डोंगराळे येथील हत्या व अत्याचार प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाच्या तपासात व न्यायालयीन प्रक्रियेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ग्रामस्थांच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या पोलीस हवालदार गंगाधर खुरासणे, पोलिस अंमलदार संभाजी पीरनाईक यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी न्यायव्यवस्थेवरील विश्वास व्यक्त केला.

महिलांवरील अत्याचार आणि गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावीपणे काम करावे, तसेच अशा प्रकरणांमध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाचे कार्य आणि नागरिकांचा सहकार्याचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र राज्य | नाशिक | धुळे | नंदुरबार