धुळे प्रतिनिधी नितीन म्हसदे 

ग्राहक संरक्षक परिषदेतर्फे सहायक जिल्हा पुरवठा


अधिकाऱ्यांना निवेदन:ग्राहकांनी केलेल्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याच्या दिल्यात सूचना



ग्राहकांनी केलेल्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याच्या दिल्यात सूचना



धुळे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनात झाली. बैठकीत ग्राहकांच्या विविध तक्रारींचा आढावा घेऊन, त्यांचे तत्काळ निवारण करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात येतील, असे सांगण्यात आले.


दिवाळीच्या हंगामात खासगी ट्रॅव्हलर्स कडून आकारण्यात येणारे अवाजवी भाडे, धुळे महानगरपालिकेच्या आवारात मोकाट फिरणारी जनावरे, सणासुदीच्या काळात पनीर व खव्यामध्ये होणारी भेसळ, अवास्तव येणारी विजेची बिले, विजेचा लपंडाव, मर्यादा ओलांडून वाजणारी डीजे, शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयातील सुविधांचा अभाव, सौर ऊर्जा संयंत्र लावल्यानंतरही जुन्या मीटरचे आकारण्यात येणारे भाडे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत, राष्ट्रीय सामाजिक कुटुंब अर्थसाहाय्य योजनेच्या अनुदानाचा लाभ मिळवून द्यावा अशा विविध विषयांवर चर्चा करून निवेदन दिले. यावेळी पीआय विनोद पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा संघटक प्रा.चंद्रकांत डागा, सहसंघटक पी.झेड. कुवर,जयश्री शहा, धुळे शहराध्यक्ष जगदीश बोरसे, डॉ.श्रीराम महाजन, डॉ.अरुण छाजेड, प्रवीण पाटील, प्रशांत पाकळे, जितेंद्र मेखे, प्रभाजी परदेशी, वरिष्ठ लिपिक गणेश पिंगळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments