भुसावळ नगरपालिका प्रारूप मतदार यादीत घोळ....
भुसावळ (12 ऑक्टोबर 2025):
भुसावळ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे या मतदार यादीनुसार शहरातील 25 पैकी दहा प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी 2011 ची मतदार संख्या गृहीत धरली आहे. संपूर्ण शहरातच मतदारांची संख्या वाढलेली दिसणे अपेक्षित आहे मात्र शहरातील नेमक्या 10 प्रभागांमध्ये मतदारांची संख्या वाढली कशी? या प्रभागात बोगस मतदार असल्याचा संशय बळावला आहे यासोबतच आजूबाजूच्या प्रभागातील मतदार संख्या ही वाढीव मतदार असलेल्या प्रभागांमध्ये समाविष्ट झाल्याची शक्यता वाढली आहे यामुळे मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याच्या तक्रारी आहेत.
अनेक प्रभागात वाढीव मतदार असल्याचे 2011 च्या जन गणनेनुसार भुसावळ शहराची लोकसंख्या एक लाख 87 हजार 421 इतकी आहे प्रभाग रचनेच्या मार्गदर्शक सूचना नुसार एका प्रभागात कमाल लोकसंख्या सात हजार 495 असेल ती काही प्रभाग 10 टक्क्यांनी कमी अधिक करण्याची शिथिलता आहे. अर्थात जास्तीत जास्त आठ हजार 244 तर कमीत कमी सहा हजार 746 इतकी लोकसंख्या ठेवणे आवश्यक आहे. या लोकसंख्येचा निकष प्रशासनाने तंतोतंतपणे पाळला गेला मात्र यामुळे मतदार संख्या काही प्रभागात वाढीव आहे.
प्रभाग 6 मधील तब्बल 400 नावे प्रभाग क्रमांक 8 च्या भाग दोन यादी समाविष्ट करण्यात आली याबाबतची तक्रार मनसेचे शहराध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी करून लेखी हरकत नोंदवली आहे प्रारूप मतदार यादीतील प्रभाग आठ भाग दोन अनुक्रमांक 10493 ते 10888 हे मतदार वगळून ते प्रभाग सहा मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी त्यांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.
अंतिम प्रभाग रचनेत नमूद नसलेल्या गवळी वाडा, सुतार गल्ली, फकीर वाडा, न्यू सातारा फाईल, कुटे गल्ली मामाजी टॉकीज परिसर महात्मा फुले नगर, हंबर्डीकर चाळ, हिरकणी शेवटचा वाडा परिसरातील सुमारे 750 पेक्षा जास्त नागरिकांची नावे प्रभाग क्रमांक 8 च्या प्रारूप मतदार यादी समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.
नगरपालिकेने 8 ऑक्टोबरला प्रभाग निहाय प्रारूप यादी प्रसिद्ध केली. या प्रारूप मतदार यादीवर 13 ऑक्टोबर पर्यंत हरकती नोंदवता येणार आहे यानंतर सुनावणी होऊन 28 ऑक्टोबरला अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे मुदतीपर्यंत मतदार यादीवर हरकतींचा पाऊस पडेल अशी शक्यता राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे.
वर्ष 2022 ला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्या वेळच्या अंतिम मतदार यादीत व आत्ताच्या प्रारूप यादीत खूप मोठा फरक आहे प्रभाग आठ मध्ये लोकसंख्या पेक्षा जास्त मतदार आहेत ते आले कुठून असा सवाल निर्माण झाला आहे प्रभाग रचना बदललेली नसताना मतदार वाढले आहेत काही ठिकाणी नावे दुसऱ्या प्रभागात लावली गेली आहेत या सगळ्या प्रकारामुळे अनेक मतदार यांना त्यांच्या हक्काच्या प्रभागात मतदान करता येणार नाही.
पालिकेने प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीवर हरकतींसाठी मुदत दिली आहे यावर हरकती नोंदवल्यानंतर नियमानुसार पुढील सुनावणी होऊन निर्णय घेतले जातील ज्यांना आक्षेप असतील त्यांनी ते अंतिम मुदतीपर्यंत नोंदवावे, असे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी कळविले आहे.
0 Comments