वाहक श्री डी एस वाकळे यांच्यातर्फ सेवानिवृत्ती निमित्ताने विद्यार्थ्यांना पेन चॉकलेट वाटप व इंदिरा गांधी विद्यालय नवलनगर यांच्या तर्फे त्यांचा सत्कार

 वाहक  श्री डी एस  वाकळे यांच्यातर्फ सेवानिवृत्ती निमित्ताने  विद्यार्थ्यांना पेन चॉकलेट वाटप व इंदिरा गांधी विद्यालय नवलनगर यांच्या तर्फे त्यांचा सत्कार 

श्री डी एस वाकळे हे धुळे बस आगर येथे कार्यरत आहे सुमारे बारा वर्षापासून ते शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना इंदिरा गांधी विद्यालय  नवलनगर ते त्यांच्या गावापर्यंत ने आण करण्याची सेवा अविरतपणे करत होते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व त्यांच्यामध्ये एक आपुलकीचं  नाते जपले गेले परंतु 28 फेब्रुवारी 2026 रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत यापुढे विद्यार्थ्यांसोबत रोजची होणारी भेट आता होणार नाही त्यामुळे त्यांच्यासोबत निर्माण झालेला स्नेह व आठवणी या कायमस्वरूपी लक्षात रहाव्या म्हणून त्यांनी या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने पेन चॉकलेट वाटप केले. डी एस वाकळे यांच्या या आपुलकीने इंदिरा गांधी विद्यालय नवल नगर यांनी त्यांचा सत्कार केला

Post a Comment

0 Comments