धुळ्यात ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा सर्वत्र डंका; प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
धुळे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाला धुळे शहरात प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवसापासून चित्रपटगृहांबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे. इतिहासप्रेमी, युवक आणि शिवभक्तांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत हा चित्रपट महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली.
चित्रपटातील दमदार अभिनय, भव्यदिव्य दृश्यरचना, प्रभावी संवाद आणि शिवचरित्राची प्रेरणादायी मांडणी यामुळे प्रेक्षक भारावून गेले आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आणि राष्ट्रप्रेम यांचे प्रभावी चित्रण प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.
धुळेतील विविध चित्रपटगृहांमध्ये सकाळपासूनच शो हाऊसफुल होत असून युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. अनेक शिवप्रेमींनी कुटुंबासह चित्रपट पाहत भविष्यातील पिढीनेही हा इतिहास जाणून घ्यावा, असे मत व्यक्त केले.
चित्रपटगृह व्यवस्थापनानेही वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन अतिरिक्त शोची व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून इतिहास, प्रेरणा आणि स्वाभिमानाची जाणीव करून देणारा ठरत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

0 Comments