फुगेवाडीत गावठी दारू पिल्याने १२ जणांचा मृत्यू; एकाला अटक

 फुगेवाडीत गावठी दारू पिल्याने १२ जणांचा मृत्यू; एकाला अटक


 


पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारू मृत्यूप्रकरणामागे अवैध ‘मिथेनॉल’चे कनेक्शन उघड झाले असून, मिथेनॉल पुरवठ्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने १२ जणांना जीव गमवावा लागला. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने तत्परता दाखवत मुख्य सूत्रधार योगेश वानखेडेला अटक केली, ज्यामुळे पुढील जीवितहानी टळली आहे. विभागाने वानखेडेच्या सर्व पुरवठा केंद्रांवर छापे टाकून इतर आरोपींनाही पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात ४८ तासांत तब्बल १२ जणांचा गूढ मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (दि. २८) दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर आज, शुक्रवारी आणखी सात जणांनी आपला जीव गमावला आहे. एकाच परिसरात लागोपाठ झालेल्या या मृत्यूंमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हे मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याची जोरदार चर्चा असली तरी एक गंभीर बाब समोर आली आहे ते म्हणजे मिथेनॉल’ चा होणारा अवैध काळाबाजार. हातभट्टी वरील दारू मधे मिथेनॉल’ मिसळणारे एक रँकेट पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या तपासात उघडकीस आले आहे.

उत्पादन शुल्क अधिक्षक अतुल कानडे यांनी तपासाबाबत सुचना देऊन पथके रवाना केली. चौकशी दरम्यान चौकशी दरम्यान वानखेडे याने ज्यांना माल.विकला त्या सगळ्यांची नावे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना दिली होती.

आकाश जाधव सह इतर आरोपींना उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई केली, त्यामुळे पुढील मृत्यूच्या घटना रोखता आल्या.


Post a Comment

0 Comments