नांदेड उन्हाचा कडाका: नांदेडमध्ये ट्रॅफिक पोलिसांना 'वंचित युवा आघाडी'तर्फे छत्रीचे वाटप





 नांदेड उन्हाचा कडाका: नांदेडमध्ये ट्रॅफिक पोलिसांना 'वंचित युवा आघाडी'तर्फे छत्रीचे वाटप 

नांदेड:

शहरात सध्या उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून नागरिकांचे हाल होत आहेत. अशा अत्यंत कडक उन्हातही शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ट्रॅफिक पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभे राहून दिवसभर आपली सेवा चोख बजावत आहेत. या कर्तव्यदक्ष पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेत आणि उन्हापासून त्यांचा बचाव व्हावा या सामाजिक भावनेतून वंचित बहुजन युवा आघाडीचे अक्षय बनसोडे यांच्या वतीने ट्रॅफिक पोलिसांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

दिवसभर रस्त्यावर थांबून कर्तव्य बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना उन्हाच्या तीव्रतेचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या याच कष्टाची दखल घेऊन हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. छत्र्या मिळाल्यामुळे वाहतूक पोलिसांना कडक उन्हात काम करताना काहीसा दिलासा मिळणार आहे.

या सामाजिक उपक्रमाच्या वेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने गोपालसिंग टाक, ॲड. वैभव लष्करे, राज बुध्दे, शुद्धोधन कापसीकर, निखिल मुंडे, प्रमोद घोसले, तुषार जेठीथोर आदींचा समावेश होता. अक्षय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे शहरात कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments