भाजप आदिवासी आघाडी मोर्चाच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड प्रविण मोरे यांची नियुक्ती


 भाजप आदिवासी आघाडी मोर्चाच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड प्रविण मोरे यांची नियुक्ती

📍धुळे | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी आघाडी मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार . देवरावजी होळी  यांच्या हस्ते,

भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी आघाडी मोर्चाच्या धुळे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी. अॅड. प्रविण प्रेमदास मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष इंजि. के. टी. सूर्यवंशी यांनी नियुक्तीपत्राद्वारे जाहीर केली.

या नियुक्तीबद्दल अॅड. प्रविण मोरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे ध्येय, धोरण आणि विकासकार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच पक्ष कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवून संघटन मजबूत करण्यासाठी कार्य करावे, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.

या नियुक्तीपत्रावर जिल्हाध्यक्ष इंजि. के. टी. सूर्यवंशी तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण उर्फ बापू खलाणे यांची स्वाक्षरी आहे

Post a Comment

0 Comments