Dhule News | धुळे पोलिसांची 'ऑल आऊट' कारवाई; पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वात गुन्हेगारांची धरपकड

 Dhule News | धुळे पोलिसांची 'ऑल आऊट' कारवाई; पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वात गुन्हेगारांची धरपकड

-


Dhule जिल्ह्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक "विशाल आनंद" यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे पोलिसांनी विशेष मोहीम राबवत असामाजिक घटक, अवैध व्यवसाय आणि संशयित हालचालींवर मोठी कारवाई केली आहे. रात्री विशेष नाकाबंदी आणि कॉम्बिंग ऑपरेशन राबवून जिल्हाभरात विविध कारवाया करण्यात आल्या.

या मोहिमेदरम्यान "24 ठिकाणी नाकाबंदी" करण्यात आली. कारवाईत "937 दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी", "73 बार, हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस तपासणी", तसेच "3 OYO हॉटेल्सची तपासणी" करण्यात आली. '25 हिस्ट्रीशीटर व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी" करण्यात आली.

तसेच पोलिसांनी "175 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त" केली, "जुगाराविरोधात कारवाई", "3 प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे", "242 मोटार वाहन कारवाया", आणि "दोन पाहिजे आरोपींना ताब्यात"  घेण्यात आले. या विशेष मोहिमेत "25 पोलिस अधिकारी, 80 कर्मचारी आणि 34 होमगार्ड" सहभागी झाले होते.

या धडक कारवाईमुळे असामाजिक घटकांमध्ये खळबळ उडाली असून, आगामी काळातही अशाच विशेष मोहिमा सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 🚔🚨

-

Post a Comment

0 Comments