प्रतिनिधी येवला
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची रणधुमाळी सुरू असतानाच येथील तहसील कार्यालय आवारात आज, गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक सुधीर वाघ याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे सहकार विभागात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला सावकारी परवान्याचे (लायसन्स) नूतनीकरण करून घ्यायचे होते. हे काम करून देण्यासाठी मुख्य लिपिक सुधीर वाघ याने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने येवला तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने सुधीर वाघ याला रंगेहात ताब्यात घेतले

0 Comments