धुळे शहराला दोन नव्या उद्यानांची भेट; 'सुलेखन उद्यान' व 'सरस्वती उद्यान'चे लोकार्पण संपन्न
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहराच्या सौंदर्यात आणि नागरिकांच्या सुविधांमध्ये भर घालणाऱ्या 'सुलेखन उद्यान' आणि 'सरस्वती उद्यान' सुदर्शन कॉलनी देवपूर या दोन नव्या उद्यानांचे लोकार्पण आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या उद्यानांचे उद्घाटन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पार पडले. धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून ही उद्याने साकारण्यात आली असून, या कार्यक्रमास माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा माजी खासदार डॉ. सुभाष भामरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी डॉ. भामरे यांनी उपस्थित नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सार्वजनिक सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले. शहर अधिक सुंदर, स्वच्छ आणि नागरिकांसाठी आनंददायी बनविण्याच्या दृष्टीने ही उद्याने महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी तसेच पर्यावरणपूरक वातावरणाचा लाभ मिळणार असून, धुळे शहराच्या विकासाच्या वाटचालीतील हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.




0 Comments