फागणे येथे आधार कार्ड नोंदणी व अपडेट शिबिराचे आयोजन; नागरिकांनी लाभ घ्यावा

 आधार कार्ड नोंदणी व अपडेट शिबिराचे आयोजन; नागरिकांनी लाभ घ्यावा


फागणे (ता. धुळे) : नागरिकांच्या सोयीसाठी आधार कार्ड नोंदणी व अपडेट करण्यासाठी दोन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

हे शिबिर श्री बालाजी CSC डिजिटल सेवा केंद्र, माणिकपुरे मंगल कार्यालय, बस स्टँड जवळ, पो. फागणे, ता. धुळे – ४२४३०१ येथे होणार आहे.

शिबिरात नवीन आधार कार्ड नोंदणी, नावातील दुरुस्ती, मोबाईल नंबर अपडेट व लिंक, पत्ता बदल, जन्मतारीख व इतर माहिती दुरुस्ती तसेच बायोमेट्रिक (फोटो, बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन) अपडेट या सेवा उपलब्ध राहणार आहेत. आधार कार्डवरील फोटो बदलण्याची सुविधाही उपलब्ध असून आवश्यक मूळ कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.

शिबिरासाठी जुने आधार कार्ड (असल्यास), मोबाईल नंबर तसेच ओळख व पत्त्याचा पुरावा सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी मो. 8669000793 / 7887767707 या क्रमांकावर संपर्क साधावा.

या शिबिराचे आयोजन अॅड. श्री. प्रवीण पी. मोरे (उपाध्यक्ष, भाजप आदिवासी आघाडी मोर्चा, धुळे जिल्हा ग्रामीण) यांनी केले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments