मानव अधिकार संरक्षण समिती, नवी दिल्लीच्या मालेगाव तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब बाळू ह्याळीज यांची नियुक्ती

 मानव अधिकार संरक्षण समिती, नवी दिल्लीच्या मालेगाव तालुका अध्यक्षपदी

 भाऊसाहेब बाळू ह्याळीज यांची नियुक्ती


मालेगाव (प्रतिनिधी): मानव अधिकार संरक्षण समिती, नवी दिल्ली यांच्या वतीने भाऊसाहेब बाळू ह्याळीज यांची मालेगाव तालुका अध्यक्ष (जिल्हा नाशिक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग, जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत असलेली बांधिलकी आणि मानवाधिकार संरक्षणासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

"मानव अधिकार संरक्षण समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजहिताची कामे अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्यांच्या नियुक्तीमुळे मालेगाव तालुक्यात मानवाधिकार संरक्षण समितीचे कार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments